फडणवीस-ठाकरे एकत्र आले अन् ‘हा’ भाजप नेता दिसताच म्हणाले, याला आधी बाहेर काढा…
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी दृश्य बघायला मिळाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे राज्यातील सर्वात मोठे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात लिफ्टमधून एकत्र प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आले आहे
आजपासून विधानसभा अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी दृश्य बघायला मिळाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे राज्यातील सर्वात मोठे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात लिफ्टमधून एकत्र प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिफ्टमध्ये असताना या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केली. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आले आहे. फडणीवस आणि ठाकरे या दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला आहे. प्रविण दरेकर देखील यावेळी लिफ्टमध्ये जाणार इतक्यात उद्धव ठाकरे यांनी आधी दरेकरांना बाहेर काढा, असं विधान केलं. यानंतर पुन्हा चर्चांना सुरूवात झाल्याचे पाहायला मिळाले. बघा संपूर्ण व्हिडीओ नेमकं काय घडलं…
Published on: Jun 27, 2024 04:03 PM
Latest Videos