उद्धव ठाकरे अन् मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची हेलिपॅडवर तपासणी, ठाकरेंचा संताप केला थेट सवाल
यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रातील ठाकरे गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारसाठी महाविकास आघाडीची सभा झाली. उद्धव ठाकरे या सभेला जाण्याआधी हेलिपॅडवर जात असतानाच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅग तपासण्यात आल्या.
यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रातील ठाकरे गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारसाठी महाविकास आघाडीची सभा आज पार पडली. मात्र या सभेला जाण्यापूर्वी यवतमाळच्या वणी हेलिपॅडवर जात असतानाच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅग तपासण्यात आल्या. या प्रकरणानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत किती जणांच्या बॅगांची तपासणी केली? असा आक्रमक सवाल संजय राऊत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची बॅग तपासली का? असा सवालच उद्धव ठाकरे यांनी थेट यंत्रणेच्या कर्माचाऱ्यांना केला. यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रातील ठाकरे गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारसभेतही उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, दाढीवाला मिंधे, गुलाबी जॅकेट आणि काय…. असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर टरबुजा असा उपस्थितांमधून आवाज आला. त्यानंतर हा यांच्या पण बॅगा पण तपासणार का?, असा आक्रमक सवालही उद्धव ठाकरेंनी केला. तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा टरबूज असा उल्लेख केला. पुढे ते असेही म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मिंधे यांच्या बॅग चालल्या होत्या. ही लोकशाही असू शकत नाही. तुम्ही भाजपचे पंतप्रधान नाही देशाचे पंतप्रधान आहे, असे म्हणत मोदींवर ही हल्लाबोल केलाय.