जोरदार धक्के देतो… उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं, बघा काय म्हणाले?
द्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन प्रवेश केला. त्यामुळे जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. तर शिवसेना असाच जोरदार धक्का देतेय, असा टोला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय. उद्धव ठाकरे उन्मेष पाटील यांना लोकसभेचं तिकीट देतील अशी चर्चा असताना त्यांना उमेदवारी मिळालीच नाही.
सध्या भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन प्रवेश केला. त्यामुळे जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. तर शिवसेना असाच जोरदार धक्का देतेय, असा टोला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय. उद्धव ठाकरे उन्मेष पाटील यांना लोकसभेचं तिकीट देतील अशी चर्चा असताना त्यांना मात्र उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिलीच नाही. अशातच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत धक्कातंत्र दिसलंय. उद्धव ठाकरे यांनी उन्मेष पाटील यांचे खंदे समर्थक करण पवार यांनाच लोकसभेची उमेदवारी दिली. पारोळा नगरपालिकेत भाजपकडून नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं. यापूर्वी एरंडोल विधानसभेसाठीही त्यांनी तयारी केली होती. पारोळा एरंडोलचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे ते नातू आहेत. सर्व पक्षांमध्ये संबंध आणि मराठा समाजाचा तरूण चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. बघा यासंदर्भात स्पेशल रिपोर्ट…