Uddhav Thackeray LIVE | नायर रुग्णालयाचं शतक, मुख्यमंत्र्यांकडून हॉस्पिटलसाठी 100 कोटींची घोषणा
नायर रुग्णालयाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केलीय. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाकडून एक अपेक्षाही व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नायर रुग्णालयाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक मोठी घोषणा केली. नायर रुग्णालयाच्या शंभरी निमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित होते. नायर रुग्णालयाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केलीय. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाकडून एक अपेक्षाही व्यक्त केलीय. यावेळी बोलताना कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.
संस्था शंभर वर्षाची किंवा बिल्डिंग शंभर वर्षाची असं नाही. हि निर्जीव इमारत नाही तर या सर्वांनी जीव ओतून ती सजीव केलेली इमारत आहे. मग एकदा या वास्तूत जान आली की मग कसलाही पेशंट असला तरी तो बरा झालाच म्हणून समजा ही माझी धारणा, माझी भावना आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही काळानुसार आधुनिकतेकडे जात आहात. महापालिकेकडून तर निधी येत असेलच, सरकारकडूनही निधी येत असेल. पण आज 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं महापालिका आणि सरकारच्या वतीनं, अर्थात दोन्ही खिसे सध्या तरी माझेच आहेत. म्हणून मी आज दोन्ही खिशात हात घालून 100 कोटी रुपयांचा निधी या संस्थेसाठी जाहीर करतो.