उद्धव ठाकरे यांचा ‘हा’ मोठा नेता लवकरच भाजपमध्ये येणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा दावा
VIDEO | संभाजीनगरमधील उद्धव ठाकरे यांच्या सभेबद्दल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
नागपूर : शिवसेनेचा आमदार संजय शिरसाट यांनी असे म्हटले की ठाकरे गटातील एका व्यक्तीचा पुण्यात एक मोठा पक्षप्रवेश होणार आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटातून भाजप आणि शिवसेनेमध्ये येणारा व्यक्ती मोठा किंवा लहान आहे, याला अर्थ नाही तर त्यांच्याकडे शिल्लक सेना उरली आहे. लहान मोठे सर्व नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहे. म्हणून ती शिल्लक सेना, किंचित सेना राहिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बोंबाबोंब करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी केला. तर पुण्यातला उद्धव ठाकरे यांचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये येणार असल्याचा मोठा दावाही त्यांनी केला. तर कालच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून देखील त्यांनी हल्लाबोल करत त्यांची राजेशाही अजून गेली नसल्याचे म्हटले. उद्धव ठाकरे यांना खरंच बाळासाहेबांचे विचार मान्य असतील तर राहुल गांधी यांच्या फोटोला २ जोडो मारावेत, असंही त्यांनी सुनावलं.