उद्धव ठाकरेंचा 'तो' फोटो मॉर्फ, उबाठा गट खवळला अन् प्रकरण थेट पोलिसांत...

उद्धव ठाकरेंचा ‘तो’ फोटो मॉर्फ, उबाठा गट खवळला अन् प्रकरण थेट पोलिसांत…

| Updated on: Aug 16, 2024 | 12:50 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रकरण थेट पोलिसांत पोहोचले आहे. या फोटोत उद्धव ठाकरे हात जोडून राहुल गांधींसमोर वाकताना दिसताय. तर खुर्चीच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे राहुल गांधींना वाकून नमस्कार करत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक फेक फोटो व्हायरल होत आहे. याप्रकरणी ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. इतकंच नाहीतर फेक फोटो व्हायरल केल्याप्रकरणी ठाकरे गट तक्रार दाखल करणार आहेत. व्हायरल होणाऱ्या फेक फोटोमध्ये उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांना वाकून नमस्कार करताना दिसताय. तर व्हायरल होणारा फोटो मॉर्फ करणाऱ्याला अन् ट्वीच करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळतेय. यानंतर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या कोणत्या फोटोशी छेडछाड झाली आहे. यासंदर्भातील ट्वीट शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर खोटं बोलणं आणि गैरवर्तन करणं हे भाजपच्या डीएनएमध्ये आहे हे आपल्याला माहिती आहे, असेही ट्वीटमध्ये म्हटले आहे. उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी केजरीवाल यांच्या आईवडिलांशी भेटताना उद्धव ठाकरे यांनी नमस्कार केला होता. तो खरा फोटो ठाकरे गट शिवसेनेकडून ट्वीट करण्यात आला आहे.

Published on: Aug 16, 2024 12:49 PM