‘एक-एक फोडण्यापेक्षा एकदाच …’, उद्धव ठाकरे यांचं भाजपाला खुलं आव्हान
VIDEO | 'जे मला सोडून गेलेत त्यांना जय महाराष्ट्र', उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाला लगावला टोला
मुंबई, २९ जुलै २०२३ | आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात ठाकरे गटातील पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांच्या पाठोपाठ माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचं काय होणार? याची चर्चा होताना दिसतेय. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी स्वतःच उत्तर दिलं आहे. एकएकाला काय फोडता हिंमत असेल तर निवडणुका घ्या, असं खुलं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे. ‘जिद्दीचं आहे आणि जिंकण्याची इर्षाही आपली आणखी वाढतेय. त्यामुळे जे गेलेत त्यांना जय महाराष्ट्र. आता त्यांचा आणि आपला संबंध तुटला. फक्त त्यांनी गेल्यानंतर पक्षाशी गद्दारी करू नये आणि पक्षाच्या विरुद्ध काम करू नये. नाही तर आपल्याला शिवसैनिक म्हणून त्यांना दाखवावे लागेल.’, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.