‘हे कळू द्या…’, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेमकं काय दिलं आव्हान?
VIDEO | तुमचं चहापान कोणत्या देशद्रोह्यांसोबत होतं? उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट सवाल, बघा काय म्हणाले?
दिनेश दुखंडे, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशद्रोह केलेल्यांसोबत चहा घेण्याची वेळ टळली, असं वक्तव्य केलं होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला असून देशद्रोह्यांसोबतची चहापानाची वेळ टळली असं मुख्यमंत्री म्हणाले तर त्यांचं चहापान कुणाबरोबर होतं? देशद्रोह्यांबरोबरच चहापान टळलं असं म्हणता तर विरोधक देशद्रोही होते का? ते देशद्रोही नव्हते. तर मग तुमचं चहापान कोणत्या देशद्रोह्यांसोबत होतं? मुख्यमंत्र्यांनीही देशद्रोही कोण आणि कुणाबरोबर चहापान घेणार होते, हे स्पष्ट करावं. ते देशद्रोही कुणाला बोलले हे कळू द्यावं, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले बघा…
Published on: Mar 02, 2023 05:24 PM
Latest Videos