Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं मुंबादेवीचं दर्शन
घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरांची दारं उघडण्यात आली आहेत. कोरोना प्रकोपामुळे गेली अनेक महिने मंदिरांची दारं बंद होती. मात्र आता कोरोना नियमांचं पालन करुन भक्तांसाठी सर्व प्रार्थनास्थळं खुली करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सहकुटुंब मुंबादेवी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. आजपासून मंदिर आणि प्रार्थना स्थळे खुली झालेली आहेत. सर्व जनतेला, भक्तांना, विनंती आहे की आनंदी राहा सुरक्षित रहा”
घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरांची दारं उघडण्यात आली आहेत. कोरोना प्रकोपामुळे गेली अनेक महिने मंदिरांची दारं बंद होती. मात्र आता कोरोना नियमांचं पालन करुन भक्तांसाठी सर्व प्रार्थनास्थळं खुली करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सहकुटुंब मुंबादेवी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर हे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. आजपासून मंदिर आणि प्रार्थना स्थळे खुली झालेली आहेत. सर्व जनतेला, भक्तांना, विनंती आहे की आनंदी राहा सुरक्षित रहा”
Published on: Oct 07, 2021 05:50 PM
Latest Videos