“आता भाजपाचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आली”, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या प्रखर मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारीत झाला. ही मुलाखत खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मलुाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई, 27 जुलै 2023 | ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या प्रखर मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारीत झाला. ही मुलाखत खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मलुाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “मी हिंदुत्व सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलंय. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्वाचं वेगळं स्वप्न होतं. हिंदुत्वाचं वेड होतं. हिंदुत्वाच्या एका विचारधारेमुळे त्यांनी समान नागरी कायदा आणि 370 कलम आदी गोष्टींना पाठिंबा दिला. एखाद्याला भ्रष्टाचारी म्हणून हिणवायचं. त्याला आयुष्यातून उठवायचं आणि त्यांच्या मांडिला मांडी लावून बसायचं हे हिंदुत्व नाहीये. भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली वाट्टेल ते खपवत आहे. ते देशातील जनता कदापी खपवून घेणार नाही. ताक सुद्धा फुंकून पिण्याची वेळ येते. तसेच भाजपचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आली आहे. तसेच मी हिंदुत्व सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलंय. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे काय? पाहिजे तेव्हा सोयीप्रमाणे नेसलं आणि सोडलं असं होत नाही.”