uddhav thackeray : ‘एकदा या गद्दाराला पाडा…’, सिल्लोडच्या प्रचारसभेतून उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
सिल्लोडचा गद्दार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर होता, असं म्हणत हेच तुमचं हिंदुत्व आणि संस्कृती आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. ते सिल्लोडच्या प्रचारसभेत बोलत होते.
एकदा या गद्दाराला पाडा, तुरूंगात टाकल्याशिवाय सोडणार नाही, सिल्लोडमधून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना थेट इशारा दिला आहे. सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणारा सिल्लोडचा गद्दार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर होता, असं म्हणत हेच तुमचं हिंदुत्व आणि संस्कृती आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. ‘जे बोलतो ते मी करून दाखवतो आणि जे करण्यासारखं असेल तेच मी बोलतो. म्हणून माझी वचनं तर आहेतच पण एकदा तुम्ही या गद्दाराला पाडा, नुसतं पाडू नका तर असं गाडा…की याच्या पापाच्या पाढ्यांची पूर्ण चौकशी करून तुम्ही भयमुक्त आणि दहशतमुक्त करून याला तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही’, असं वचन मतदारांना उद्धव ठाकरेंनी दिलं आणि अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला. पुढे उद्धव ठाकरे असेही म्हणाले की, या गद्दाराने माध्यमांच्या कॅमेऱ्यावर सुप्रिया सुळेंना शिवागाळ केली. हाच माणूस त्याच्या निवडणुकीच्या प्रचाराला पंतप्रधान मोदींच्या व्यासपीठावर होता. हेच हिंदुत्व आहे का? असा सवाल ठाकरेंनी केला. ते सिल्लोडच्या प्रचारसभेत बोलत होते.