किती खोक्याला एक 'कांदा' गेला? 'कांद्या'ला भाव मिळाला, उद्धव ठाकरेंचा सुहास कांदेंना टोला

किती खोक्याला एक ‘कांदा’ गेला? ‘कांद्या’ला भाव मिळाला, उद्धव ठाकरेंचा सुहास कांदेंना टोला

| Updated on: Mar 26, 2023 | 10:38 PM

VIDEO | पुन्हा एकदा खोक्यांचं राजकारण तापणार? आमदार सुहास कांदे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी केला खोक्यांचा उल्लेख

नाशिक : उद्धव ठाकरे यांनी कोकणातील रत्नागिरीच्या खेडमधील सभेनंतर आज उत्तर महाराष्ट्रातील मालेगावमध्ये सभा घेताना त्यांनी सत्ताधारी गटावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या सभेत खासदार संजय राऊत यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. या कांद्याला रस्त्यावर फेकायचे आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर टीकी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यावर जोरदार ह्ललाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सुहास कांदे यांच्यावर टीका करताना त्यांनी कांद्याला किती भाव मिळाला असं म्हणत कांद्याला किती खोके मिळाले, असा टोला त्यांनी शिवसेना आमदार सुहास कांदे यांना लगावला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला.

Published on: Mar 26, 2023 10:38 PM