फोडणवीस, घरफोड्या अन् फावडा… अशोक चव्हाण यांच्या प्रवेशावर ठाकरे-भाजपमध्ये जुंपली
अशोक चव्हाण यांच्यासह डझनभर नेत्यांवर आरोप केलेत तेच भाजपमध्ये गेल्याने फडणवीस यांच्यावर ठाकरेंनी निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री नाही तर घरफोड्या मंत्री आहेत, असं म्हणायला हवं अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : आधी अशोक चव्हाण यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले नंतर त्यांनीच त्यांना पक्षात घेतलं, असा हल्लाबोल करत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा उल्लेख फोडणवीस आणि गृहमंत्रीऐवजी घरफोड्या मंत्री असा केला. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून भाजपने जोरदार पलटवार केलाय. ज्या नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्यासह डझनभर नेत्यांवर आरोप केलेत तेच भाजपमध्ये गेल्याने फडणवीस यांच्यावर ठाकरेंनी निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री नाही तर घरफोड्या मंत्री आहेत, असं म्हणायला हवं अशी खोचक टीकाही त्यांनी केली. अजून कितीजणांना भाजपमध्ये घेऊन पवित्र करणार, यावरून ठाकरे समर्थक भास्कर जाधवांनी वाचलेल्या यादीचाही व्हिडीओ व्हायरल केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Feb 15, 2024 11:43 AM
Latest Videos