‘सभेत सुद्धा वाचू का? विचारलं जातं’, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना नेमका काय लगावला टोला
VIDEO | संभाजीनगर मधील वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला हल्लाबोल
संभाजीनगर : ‘तुम्हाला विचार दुसऱ्यांचे लागतात, सभेत वाचू का वाचू का असे विचारतात. जे असे वागतात त्यांना मला सांगायचे आहे, सभेतही वाचू का विचारतात. तुम्ही दुसऱ्याचे विचार मांडता. तुमच्यासमोर ठेवलेलं कदाचित तुम्ही वाचाल. पण समोर बसलेली जनता मतदानाला उतरेल तेव्हा तुम्हाला वाचवू शकणार नाही. जनतेशी खेळ करु नका’, असं उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांना ठणकावून सांगितलं. कागदावर लिहून आणलेलं तुम्ही अडखळत वाचाल पण ही जनता तिच्याशी खेळू नका, असे म्हणत आमचं सरकार हे खेळणारं नाही देणारं आहे? आतापर्यंत काय दिलं असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तरुणांना रोजगार दिलं. शेतकऱ्यांना हमीभाव दिला? राजेश टोपे यांनी आरोग्य खातं ज्या पद्धतीने सांभाळलं होतं त्याबद्दल धन्यवाद देतो. राजेश टोपे यांना औषधांचं नाव तोंडपाठ होतं. पण आताचे आरोग्य मंत्रा आहेत ते… जाऊद्या त्यांच्यावर कोणताही विषय बोलण्यासारखं नाही”, असा टोला त्यांनी लगावला.