उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरून विरोधकांची पुन्हा एकदा केली कानउघडणी, काय म्हणाले बघा
VIDEO | हिंदुत्वाचा बुरखा घालून जर कोणी राष्ट्र गिळायला निघाला असेल तर..., उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना काय दिला थेट इशारा; बघा व्हिडीओ
मुंबई : एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने बहाल केले. यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी राज्यातील विरोधकांसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी कालही हिंदुत्वाच्या मुद्याला स्पर्श करत आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्वाला सोडले नाही असे स्पष्ट मत मांडले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आज पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून जे राष्ट्रीय हिंदू आहेत असे वाटते त्यांना आता लढाईला उभा राहिले पाहिजे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. हिंदुत्व हे आमचे राष्ट्रीयत्व आहे. त्यामुळे राष्ट्र प्रथम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हिंदुत्वाचा बुरखा घालून कोणी राष्ट्र गिळायला निघाला असेल तर कडवट राष्ट्रवादी राष्ट्रीय हिंदू म्हणून जे या विचाराचे आहेत त्यांनी लढाईला आता उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा

'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात

मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
