पूर्वी पत्रकारांच्या हातात कलम असायचं, पण आता…, उद्धव ठाकरे यांचा रोख नेमका कुणाकडे?
VIDEO | न्यायालय बुडाखाली घेणार असू तर लोकशाही राहणार का? उद्धव ठाकरे यांचा राग अनावर, बघा काय म्हणाले?
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील भाषणातून भाजप, मोदी सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. मधल्या काळात केंद्रीय कायदा मंत्री रिजिजू जे काही म्हणाले, त्यांचं आणि न्यायालयात जे काही चाललेलं आहे, काहीही स्वतंत्र्य ठेवायचं नाही. पूर्वी पत्रकारांच्या हातात कलम असायची, पण आता कमळ असतं. स्वातंत्र्य सगळ्याचं मारुन टाकायचं. वृत्तपत्र स्वातंत्र्य मारुन टाकायचं, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता निशाणा साधला. तर निवडणूक आयोगावर टीका करताना ते म्हणाले, “आम्ही घटनातज्ज्ञांशी जे काही बोलतोय, स्वच्छ आणि स्पष्ट शब्दांत लिहिलेलं आहे की, काय केलं म्हणजे अपात्र ठरतात किंवा अपात्र ठरत नाही. सुप्रीम कोर्टात सध्या खटला सुरु आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. पण हे सगळं सुरु असताना निवडणूक आयोगाने मध्ये चोमडेपणा करायची गरज नव्हती”, असे म्हणत त्यांनी राग व्यक्त केला.