Video | जा त्या नार्वेकर लबाडाला सांगा, हिंमत असेल तर..' उद्धव ठाकरे कडाडले

Video | जा त्या नार्वेकर लबाडाला सांगा, हिंमत असेल तर..’ उद्धव ठाकरे कडाडले

| Updated on: Jan 23, 2024 | 9:49 PM

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महाअधिवेशन नाशिक येथे सुरु आहे. या अधिवेशनानंतर नाशिक येथे मंगळवारी रात्री झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली. त्या लबाडाला सांगा, हिंमत असेल तर येथे येऊन बोल. मी तुझ्यासोबत येतो, सांग शिवसेना कुणाची ? अशा शब्दात उद्धव ठाकर यांनी नार्वेकरांवर कोरडे ओढले.

नाशिक | 23 जानेवारी 2024 : उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे तुफान फटकेबाजी केली. जा त्या नार्वेकरला सांगा, लबाडाला सांगा, हिंमत असेल तर इकडे येऊन बोल मी तुझ्याबरोबर येतो. सांग शिवसेना कुणाची ? असे आव्हानच राहुल नार्वेकर यांना उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. ते पुढे म्हणाले की बंद दाराआड तू निर्णय देतोस. ज्या गोष्टी दिल्याच नाही सांगतो, आम्ही त्याचे पुरावे दिले जनतेच्या न्यायालायत परवा मांडले आहेत. शिवसेनेत अमुकच नाही. शिवसेनेची घटनाच मिळालेली नाही असे हे म्हणतात. 2013 साली हेच गृहस्थ उभे होते बिल्ला घालून असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. जे पक्षप्रमुखच नाही म्हणत होते तेच दाढी खाजवत आपल्या पाया पडले होते अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. जनते समोर हात करीत तुमचे आशीर्वाद ही शिवसेनेची घटना आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपाकडे शंकराचार्यांना मान नाही. मित्रांना मान नाही अशीही टीकाही त्यांनी यावेळी केली.

Published on: Jan 23, 2024 09:48 PM