‘…आणि ‘शिवसेना’ हे नाव आपल्याला पुन्हा मिळणार’, उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं?
VIDEO | 'काही वेळा आपली फसगत होते. ज्यांना आपण आपलं मानतो तेच...', उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल
मुंबई : ‘काही वेळा आपली फसगत होते. ज्यांना आपण आपलं मानतो ते बांडगुळं निघतात. तरीदेखील ते आपल्यासोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं, पण प्रत्यक्षात ते त्या फांदीवरती मूळ वृक्षाचा रस शोषत असतात. वृक्षाला वाटतं, हे आपल्याच सोबत आहेत.’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीवर भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी मुलाखत घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. तर निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्ह देण्याचं आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही, असे म्हणत असताना उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेना’ हे नाव आपल्याला पुन्हा मिळणार असा विश्वासही व्यक्त केला आणि सामनाच्या मुलाखतीतून त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.