मनसेची महायुतीत एंट्री पक्की, ‘शेपूट’वरुन ठाकरे आणि शिंदेंमध्ये जुंपली
मनसेला महायुतीत घेण्यासंदर्भातील हालचालींना वेग आलाय. शिंदे-फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांची भेट झाली. त्यामुळे लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लबोल केलाय.
दिल्लीत अमित शाह आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेला महायुतीत घेण्यासंदर्भातील हालचालींना वेग आलाय. शिंदे-फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांची भेट झाली. त्यामुळे लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लबोल केलाय. आमच्या सग्यासोयऱ्यांना या म्हटलं की दिल्लीत शेपूट हालवत जातात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्रीपदासाठी कोणी शेपूट घातलं? असा पलटवार शिंदेंनी ठाकरेंवर केला. मुंबईत वांद्रयाच्या ताज लॅन्डस हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज ठाकरे यांची जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीमध्ये मनसेकडून राज ठाकरेंनी ३ जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिक अशा तीन जागांसाठी मनसे आग्रही असल्याचे कळतेय.