मग आता चिता सरकार म्हणायचं का? मोदींच्या ‘त्या’ दाव्यावर उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल
भारतात अनेक वर्षांनी चित्ता आणण्यात आला आहे. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
मुंबई : भारतात अनेक वर्षांनी चित्ता आणण्यात आला आहे. सत्तर वर्षानंतर भारतात प्रथमच चित्ता आल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपाला खोचक टोला लगावला आहे. आज अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये चित्ता हा प्राणी आला आहे. मराठीमध्ये आपण त्याला चित्ता बोलतो आणि इंग्लिशमध्ये चिता बोलतात. आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आपण त्यांना आता चिता सरकार म्हणायचे का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. दरम्यान त्यांनी यावेळी प्रताप सरनाईक यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. प्रताप सरनाईक यांची केस लोकशाहीपेक्षाही मोठी आहे. त्यामुळे ही केस मागे घेण्याची घाई सरकार करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
Published on: Sep 18, 2022 10:59 AM
Latest Videos