हाच आपला विजय म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा, बघा काय म्हणाले उद्धव ठाकरे?

हाच आपला विजय म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा, बघा काय म्हणाले उद्धव ठाकरे?

| Updated on: Feb 18, 2023 | 5:00 PM

VIDEO | 'एक जमाना होता लोकं मोदी यांचा मुखवटा घालायचे पण आता मोदींना बाळासाहेब यांचा मुखवटा घालावा लागतोय' असं म्हणत उद्धव ठाकरे कडाडले

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं काल धनुष्यबाण आणि शिवसेना हे दोन्ही शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर मातोश्रीबाहेरून उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असेल यंत्रणा हाताशी धरून पक्ष संपवता येईल पण त्यांच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना पक्ष संपवता येणार नाही. काल निवडणूक आयोगाने निर्णय देत निवडणूक आयुक्तांनी काल गुलामी केली. या गुलामांना माझे आव्हान आहे, शिवसेना कुणाची हे जनतेला ठरवू द्या, यांना केवळ ठाकरे नाव बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे पण ठाकरे कुटुंब नको. आम्ही या आधी मोदींचे नाव घेऊन मतं मागितले असे म्हणताय पण त्यावेळी युती होती म्हणून मागितली. एक जमाना होता लोक मोदींचे मुखवटे घालून यायचे. आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून मते मागावी लागत असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला.

Published on: Feb 18, 2023 05:00 PM