गोळीबार अन् आरोपांच्या फैरी, ठाकरेंनंतर आता भाजपसोबत गद्दारी करणार? मुख्यमंत्र्यांवर गणपत गायकवाड यांचा घणाघा
भाजप आमदाराने शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्याने हा वाद दोघांमधील नाही तर सरकारमधील गँग वॉरचा आहे, अशी घणाघातील टीका उद्धव ठाकरेंनी केली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारानंतर जी प्रतिक्रिया दिली, त्यावर विरोधक सरकारविरोधात आक्रमक
मुंबई, ५ फेब्रुवारी २०२४ : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारावरून राजकीय फैरी झडतात. हे दोन व्यक्तींमधलं भांडण नसून शिंदे-फडणवीस सरकारमधील गँग वॉर असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून विरोधक सरकारला घेरताय. भाजप आमदाराने शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्याने हा वाद दोघांमधील नाही तर सरकारमधील गँग वॉरचा आहे, अशी घणाघातील टीका उद्धव ठाकरेंनी केली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारानंतर जी प्रतिक्रिया दिली, त्यावर विरोधक सरकारविरोधात आक्रमक झालेत. गणपत गायकवाड म्हणाले, ‘मीच गोळी झाडली, मला काहीही पश्चाताप नाही. माझ्या जागेचा या लोकांनी ताबा घेतला. पोलीस स्टेशनच्या दरवाजात माझ्या मुलाला धक्काबुकी केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्यचा प्रयत्न करतायेत. शिंदे मुख्यमंत्री असतील तर राज्यात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील’, असे त्यांनी म्हटले.