Uddhav Thackeray : ठाकरेंनी धनुष्यबाणाची आशा सोडली? राजकीय विषयाच्या अभ्यासकांची मतं जाणून घ्या….
शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते घरोघरी पोचवण्यासाठी कंबर कसा, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. आमदारांच्या अपात्रेवर 11 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, याच बातमीवर राजकीय विषयाच्या अभ्यासकांची मतं जाणून घ्या...
मुंबई : ‘कायदेशीर लढाईत दुर्दैवाने अपयश आले तरी गाफील न राहाता शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते घरोघरी पोचवण्यासाठी कंबर कसा,’ असं म्हणत ‘नव्या चिन्हाची तयारी ठेवा’ असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना यावेळी पक्ष चिन्हाबाबत बोलताना चिंता व्यक्त केल्याचं दिसतंय. शिवसेनेच्या (Shiv sena News) 40 आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलंय. ते पाहाता पक्षाचे धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा किंवा ते गोठवण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं ठाकरे म्हणालेत. शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते घरोघरी पोचवण्यासाठी कंबर कसा, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. आमदारांच्या अपात्रेवर 11 जुलैला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court on Shiv sena News) सुनावणी होणार आहे. दरम्यान, याच बातमीवर राजकीय विषयाच्या अभ्यासकांची मतं जाणून घ्या…