उद्धव ठाकरेंकडून संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची विचारपूस

उद्धव ठाकरेंकडून संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची विचारपूस

| Updated on: Aug 01, 2022 | 2:57 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटो समोर आले आहेत. संजय राऊत यांच्या भांडुप इथल्या घरातील भेटीदरम्यानचे हे फोटो आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटो समोर आले आहेत. संजय राऊत यांच्या भांडुप इथल्या घरातील भेटीदरम्यानचे हे फोटो आहेत. उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पाहुणे दाखल झाले. हे काय चाललं आहे की लाज-लज्जा सोडून देशात दडपशाही सुरू आहे, असं टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपवर सोडलं.