अजित पवार यांच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'मला एकट्याला...'

अजित पवार यांच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, ‘मला एकट्याला…’

| Updated on: Apr 18, 2023 | 1:37 PM

VIDEO | महाराष्ट्रातील राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, खासगीत काँग्रेस नेत्याकडे काय केलं वक्तव्य

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांची युती होती त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद भुषवलं मात्र त्यांनंतर शिंदे गट वेगळा झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झालेत. या राजकीय भूकंपाला काहीच महिने उलटल्यानंतर आता पुन्हा वेगवेगळे राजकीय समीकरण उदयास येताना दिसताय. अशातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चादेखील राजकीय वर्तुळात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सरू असून ते नॉट रिचेबल झाल्याचेही पाहायला मिळाले होते. दरम्यान, या राज्यातील वेगवेगळ्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मला एकट्याला भाजपसोबत लढावं लागेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी खासगीत काँग्रेस नेत्याकडे केल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Apr 18, 2023 01:35 PM