‘उद्धव ठाकरेंनी सगळंकाही दिलं, तरी भुमरेंनी बेईमानी केली’ -भास्कर जाधव
वस्तुस्थिती असेल अशी टीका नेते भास्कर जाधव यांनी केली आहे. पैठण येथे होणाऱ्या सभेत लोक जमावण्यासाठी पैसे वाटप करण्यात आलेल्याची व्हिडीओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली आहे.
मुंबई – संदीपान भुमरे(Sandipan Bhumare) यांना शिवसेनेनं सहा वेळा उमेदवारी दिली. त्यांना शिवसेनेने त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री केलं. तरी सुद्धा संदिपान भुमरे हे पुन्हा शिवसेनेला धोका देऊन, विश्वासघात करून , शिवसेना (Shivsena)सोडून गेले, ते कशा करता गेले? तर शेवटी काही मिळवले त्यातलं वाटलंच पाहिजे आणि म्हणून ते वाटत असतील त्यामुळे त्यामध्ये काय उपवासाचे कारण नाही. तर ती वस्तुस्थिती असेल अशी टीका नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. पैठण येथे होणाऱ्या सभेत लोक जमावण्यासाठी पैसे वाटप करण्यात आलेल्याची व्हिडीओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली आहे.
Published on: Sep 12, 2022 02:09 PM