तरच तुम्ही खरे गृहमंत्री, विरोधकांवर काडतूसं फेकूण मारता तिही भिजलेली; राऊत फडणवीसांवर बरसले

| Updated on: Apr 06, 2023 | 1:01 PM

खासदार संजय राऊत पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी ही टीका आमदार राहुल कुल यांच्यावरील भ्रष्टाचारावरून केली आहे

मुंबई : सध्या राज्यात उद्धव ठाकरे गट आणि भाजप हे आमने सामने आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाणे मारहाण प्रकरणावरून टीका केली होती. तसेच राज्याला फडतुस उपमुख्यमंत्री मिळाल्याचे म्हटलं होते. त्यावर पलटवार करताना फडणवीस यांनी आपण फडतुस नसून काडतूस असल्याचे म्हटलं होते. त्यावरून खासदार संजय राऊत पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी ही टीका आमदार राहुल कुल यांच्यावरील भ्रष्टाचारावरून केली आहे. कुल यांच्याबाबत आपण सबळ पुरावे देऊनही का कारवाई झाली नाही? याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवं असेही ते म्हणाले. तुम्ही काडतूस आहात ना, तर घाला त्या भ्रष्टाचांरांना. तर तुम्ही खरे गृहमंत्री. पण या भ्रष्टाचांऱ्यांना मांडीवर घेऊन बसला आहात आणि विरोधकांना काडतूसे फेकून मारत आहात. तेही भिझलेली अशी टीका केली आहे. गुंडांना पाठीशी घालण्याचे काम हे सरकार करत आहे.

Published on: Apr 06, 2023 12:56 PM
राहुल कुल यांचे नाव घेत संजय राऊतांचा सीबीआय आणि ईडीवर घणाघात
मला दिवसातून फक्त एक वेळा पाणी मिळायचं; कारागृहातील अनुभव सांगताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर