Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना पक्षासाठी 7 वर्ष अनवाणी, निष्ठावंत महिला शिवसैनिकानं सोडली ठाकरेंची साथ, नेमकं झालं काय?

शिवसेना पक्षासाठी 7 वर्ष अनवाणी, निष्ठावंत महिला शिवसैनिकानं सोडली ठाकरेंची साथ, नेमकं झालं काय?

| Updated on: Jan 29, 2025 | 12:42 PM

शिवसेना पक्षासाठी तब्बल सात वर्ष अनवाणी फिरणाऱ्या एका शिवसैनिकानं उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. वर्सोवातल्या शिवसेना उपनेत्या राजुल पटेल यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पक्षातली गळती रोखण्याचा आव्हान उद्धव ठाकरे समोर निर्माण झाले.

ठाकरेंच्या शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्या… जुन्या महिला शिवसैनिक आणि ठाकरे घराण्याशी अनेक वर्ष एकनिष्ठ राहिलेल्या राजुल पटेल यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. 23 तारखेला याच राजुल पटेल जोगेश्वरीतल्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात व्यासपीठावर होत्या. पण अवघ्या चारच दिवसात त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला. राजुल पटेल ठाकरेंच्या शिवसेनेत उपनेता या पदावर होत्या. वर्सोवा विधानसभेत त्यांनी महिला संघटक म्हणून काम पाहिले होतं. पक्षातल्या जुन्या महिला शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा राजुल पटेल यांनी 2012 मध्ये केली होती. 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरच तब्बल सात वर्षांनी त्यांनी पायात चप्पल घातली. 2019 मध्ये त्यांनी वर्सोवा विधानसभेत अपक्ष निवडणूक लढवत 32 हजारांपेक्षा जास्त मत मिळवली. 2024 मध्येही त्यांनी पक्षकडे विधानसभेचं तिकीट मागितलं होतं मात्र पक्षाने हरून खान यांना उमेदवारी दिली त्यामुळे राजुल पटेल नाराज होत्या. राजुल पटेल यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वर्षो यातल्या शाखेवरूनही वाद सुरू झाला. शाखेला टाळा लावून राजुल पटेल यांनी चावी स्वतःकडे ठेवल्याने ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 29, 2025 12:42 PM