शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल मॅनेज होता? ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा काय?

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल मॅनेज होता? ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा काय?

| Updated on: Jan 11, 2024 | 4:20 PM

शिवसेना आमदार अपात्रतेचा हा निकाल मुख्यमंत्री शिंदे यांना माहिती होता. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना अपात्र आमदारांवर भाष्य करत जोरदार हल्लाबोल केलाय.

छत्रपती संभाजीनगर, ११ जानेवारी, २०२४ : शिवसेना आमदार अपात्रता निर्णय आम्हाला मान्य नाही. हा निर्णय मॅनेज झालेला आहे. स्पीकर तुमच्याकडे का येऊन बसतात? तुम्ही तीन तीन वेळेस दिल्लीला जातात. हा निकाल मुख्यमंत्री शिंदे यांना माहिती होता. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना अपात्र आमदारांवर भाष्य करत जोरदार हल्लाबोल केलाय. तर अब्दुल सत्तार 15 तारखेनंतर राहतील का नाही ते बघा. सत्तार यांच्या मुळे भाजपची प्रतिमा खराब होते, नेहमी मी सांगितले आहे. आम्हाला सुप्रीम कोर्ट न्याय देईल.मशाल चिन्ह आमच्याकडेच राहील. कालच्या निकालानंतर शिवसैनिक चिडून उठले आहेत, शिवसैनिक आता छलांग मारेल आणि आमची तयारी सुरू असल्याचेही ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 11, 2024 04:20 PM