राज्यात भांग पिऊन सत्तेत, भांग उतरली की…, संजय राऊत यांची शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका
VIDEO | पुढील काळात भांग उतरल्याशिवाय राहणार नाही, संजय राऊत यांनी नेमका काय दिला इशारा
मुंबई : राज्यात कालच धुलवंदनाचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी राजकीय नेत्यांनी देखील आरोप प्रत्यारोप करत राजकीय धुळवड साजरी केली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मित्रांना भांग पाजली होती, अशी खोचक टीका केली होती. या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भांग कुणी पाजली? त्यांनीच का? असा सवाल करतानाच महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आलंय? ती भांग उतरली की सत्ता जाईल, असे म्हणत त्यांनी सडकून टीका केली आहे. यासह ते असेही म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना लवकरच कळेल महाराष्ट्र आणि राज्यातील जनता काय आहे. त्यांची सर्व भांग कसब्यात उतरली आहे, असा जोरदार हल्लाबोलही राऊत यांनी केला. बघा नेमकं काय म्हणाले संजय राऊत…
Published on: Mar 08, 2023 11:10 AM
Latest Videos