‘शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मोदी-शहांच्या मांत्रिकाची गरज अन्…’, राऊतांचा टोल्यावर शिरसाटांचा पलटवार काय?
'शिंदे आपल्या मंत्र्यांना देखील भेटले नाहीत. त्यांची तब्येत फारच खराब आहे असं दिसतंय. प्रकृती नाजूक असलेल्या माणसाला कोणीही त्रास देऊ नका. तर ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी आहे. या शपथविधीला शिंदे येतात की नाही', संजय राऊत यांचा टोला
एकनाथ शिंदे यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्याविषयी काही बोलू नका, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला आहे. इतकंच नाहीतर एकनाथ शिंदे यांना डॉक्टर की मांत्रिकाची गरज आहे? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी केला आहे. ‘काल आपण प्रसारमाध्यमांवर पाहिलं, एकनाथ शिंदे हाताला पट्ट्या लावून बसले होते. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले. परंतु, शिंदे आपल्या मंत्र्यांना देखील भेटले नाहीत. त्यांची तब्येत फारच खराब आहे असं दिसतंय. प्रकृती नाजूक असलेल्या माणसाला कोणीही त्रास देऊ नका. तर ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी आहे. या शपथविधीला शिंदे येतात की नाही याबाबत शंका आहे. त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे आणावं लागू शकतं’, असं संजय राऊत म्हणाले तर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेवर शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. ‘संजय राऊत यांच्याकडे माणुसकी आणि संस्कार नाहीत. संजय राऊत यांनी केलेल्या जादूटोण्यावरच आम्ही उतारा करायला दरेगावला गेलो होतो. त्यांना चांगलंच माहितीये बंगालच्या जादूगाराची जादूही आमच्यावर चालली नाही.’