Sanjay Raut : राऊतांना मातोश्रीवर धुतलं अन् काही तास एका खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; संजय राऊत भडकले
संजय राऊतांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. दरम्यान यानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत आरएसएसवर निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना मातोश्रीवर कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. १ जानेवारी २०२५ ला उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाची बैठक होती. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान संजय राऊत यांच्या वक्तव्याचा पक्षाला फटका बसत असल्याची टीका काही नेत्यांनी केली. यावरून संजय राऊत आणि नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. शब्दांनी शब्द वाढत गेल्यानंतर काही वेळानंतर बाचाबाचीच रूपांतर हाणामारीमध्ये झालं. उद्धव ठाकरे समोर राऊतांना नेत्यांनी मारहाण केली. इतकंच नाही तर काही तास एका खोलीमध्ये कोंडून ठेवल्याचा दावा एका YouTube चॅनेलने केलेला आहे. बातम्या व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी ही ट्विट केलंय. संजय राऊतांना मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समोर उभ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चोपला असं ट्वीट निलेश राणे यांनी केलंय. दरम्यान व्हायरल बातम्यानंतर संजय राऊत संतापले. RSS च्या आयटी सेलला काही काम उरलेलं नाही, राऊतांनी अशा शब्दात RSS वर टीका केली आहे. दरम्यान, ‘मी त्यांना पुरून उरणारा माणूस आहे आणि उरलेलो आहे.त्यांच्या छाताड्यावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे. तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं मला मारण्याचे प्रयत्न झाले, माझ्या बदनामी करण्याच्या मोहिमा राबवल्या, आता हे नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या’, असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय.