Uddhav Thackeray गटातील नेत्याची सडकून टिका, “निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर संस्कार नावाचं व्हिटॅमिन कमी पडलं”
VIDEO | इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजप आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांची जोरदार टीका, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं जशाच तसं प्रत्युत्तर, बघा काय म्हणाले?
पुणे, १ सप्टेंबर २०२३ | उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात भाजपवर जोरदार फटकेबाजी करत जोरदार निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. इंडिया आघाडीची बैठक आज मुंबईत होत आहे. या बैठकीवर सताधाऱ्यांकडून जोरदार टीका होताना दिसतेय. इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजप आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांनी सडकून टीका केली. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर संस्कार नावाचं व्हिटॅमिन कमी पडलं आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीवर किटकांसारखे अनेकजण टीका करत आहेत, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. यासह त्या असेही म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या काळात जी भाजपा होती. त्या भाजपाचं केंद्र सरकारमधील नेत्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वरूप बदललं असून भाजप आता भाड्याने जमवलेला पक्ष बनला आहे, अशी खोचक टीका केली.