‘ऐसा कैसा चलेगा…’, सुषमा अंधारे यांचा रोख नेमका कुणावर, काय केला नेमका सवाल?
VIDEO | भाजप आणि शिंदे-फडणवीस सरकारकडून ठाकरे गटातील महिल्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका, सुषमा अंधारे यांनी काय केली टीका?
अहमदनगर : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनाही शुभेच्छा देताना त्यांनी टोला वजा शुभेच्छा दिल्या आहे. खेड इथल्या विराट सभेचे उद्धवदर्शन बघून चंद्रशेखर बावनकुळे आणि फडणवीस साहेबांना उपरती झाली असेल, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. तर आज होळीचा धुळवळीचा दिवस आहे. आजच्या दिवशी शत्रूलादेखील मित्र म्हणून समजलं जातं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या असल्या तरी आम्ही त्यांच्या टिपणीकडे सकारात्मक पद्धतीने बघतो असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. भाजप आणि शिंदे-फडणवीस सरकारकडून ठाकरे गटातील महिल्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. तुम्ही आमच्या घरातल्या महिलांवर शिंतोडे उडवायचे, आमच्याच माणसांना आमच्या अंगावर सोडावे आणि पुन्हा जर साजूकपणाचा आव आणत असाल तर ऐसा कैसा चलेगा असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.