‘… लाथ मारून शिवसेनेचा भगवा फडकणार’, संजय राऊत आक्रमक होत नेमकं काय म्हणाले?
VIDEO | महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर, संजय राऊत यांचं पुन्हा भाष्य अन् काय व्यक्त केला विश्वास
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची घेतलेली भेट, महाविकास आघाडीच्या जागा वाटप, रायगडावर होत असलेला शिवराज्याभिषेक सोहळा आणि शिवसेनेचं महाअधिवेशन यांवर संजय राऊत यांनी भाष्य केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकसभा आणि विधानसभेचं जागा वाटप सुरळीतपणे पार पडेल. कुणाला चिंता वाटण्याचं कारण नाही. आनंदाच्या उकाळ्या फुटण्याचं कारण नाही. प्रत्येक जागेचा ऊहापोह केला जाईल. कोण जिंकू शकतं. एकमेकांना कशी मदत करायची त्यावर चर्चा होईल. त्यानंतर विधानसभेचं जागा वाटपही त्याच पद्धतीने होईल. आमच्यात कोणतेही मतभेद होणार नाही. वज्रमूठ कायम राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर शिंदे सरकारला बेकायदेशी असल्याचे म्हणत बेकायदेशीर सरकारला लाथ मारणं हा आमचा अजेंडा आहे. बेईमानी करणाऱ्यांना नेस्तनाबूत करणं, शिवसेना पुन्हा शिखरावर नेणं हा आमचा मुख्य कार्यक्रम आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांचं सिंहासन लवकरच हलणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.