'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमकं काय म्हणाले?

‘मोदी तो गयो…’, संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Oct 06, 2024 | 12:40 PM

हरियाणा आणि जम्मू काश्मीर येथील विधानसभा निवडणूक निकाल येण्यापूर्वीच एक्झिट पोल समोर आले आहेत. यामध्ये भाजपला मोठा झटका मिळणार असून हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे म्हटले आहे. अशातच संजय राऊत यांनी मोठं विधान करत 'मोदी तो गयो', असा खोचक टोला लगावला आहे.

नुकत्याच हरियाणा आणि जम्मू-काश्मीर येथे विधानसभा निवडणुका पार पडल्या. जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी समोर येणार आहे. या निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वीच एक्झिट पोल समोर आले आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी एक्झिट पोलनुसार भाजपला मोठा झटका बसणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. नाशिकमधील मेळाव्यात संजय राऊत यांनी आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचे म्हटले आहे. मोदी सरकारने आता कुठेही निवडणुका घ्याव्यात, भाजपचा दारूण पराभव निश्चित होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला असून ‘मोदी तो गयो’, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. आता परिवर्तनाची ताकद आपल्याकडे आहे. मोदींच्या राज्यात अन्यायाचा कहर झाला. परिवर्तनाची ताकद आपल्याकडे असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतील कोणताही घटक पक्ष निवडून येईल. तेच लोकं निवडणूक जिंकतील, मोदी तो गयो असा चिमटा त्यांनी काढला.

Published on: Oct 06, 2024 12:40 PM