Special Report | नितेश राणे यांचं भाकीत चुकलं, संजय राऊत दावा ठोकणार, नेमकं प्रकरण काय?
VIDEO | नितेश राणे यांचं भाकीत चुकलं, संजय राऊत यांचं कोर्टात आव्हान, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : 10 जूनच्या आधी संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, असा दावा किंबहुना असं भाकीत भाजप नेते नितेश राणे यांनी करत राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली होती. मात्र हे भाकित खोटं ठरल्याने आता संजय राऊत हे त्यावर कायदेशी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्याला नितेश राणे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ७ मे रोजी नितेश राणे यांनी हा केलेला दावा आता खोटा ठरला आहे. मात्र १० जून उलटून गेल्याने आता संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची तयाकी केली आहे. यापूर्वीही नितेश राणे यांनी १ मे नंतर वज्रमूठ सभा होणार नसल्याचे भाकीत केले होते. मविआवर उद्धव ठाकरे यांचा बोजा झाल्याचेही म्हटलं होतं. त्यानंतर सभा झाली नसली तरी एकत्रित लढण्यासाठी मविआकडून चाचपणी सुरू झालीये. तर राऊत यांच्याकडून नितेश राणे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविण्यात आली असून त्यावर 4 जुलैला सुनावणी होणार आहे. तर नितेश राणेंना आता यावर कोर्टातच उत्तर द्याव लागणार आहे.