चिलीम मारून भाजप पक्ष फोडतो, पक्षफोडीवरून कुणाची जहरी टीका?
भाजपला पक्ष फोडण्याची नशा आहे. तर चिलीम मारून भाजप पक्ष फोडण्यासाठी निघतो, असं वक्तव्य करत ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केलाय. इतकंच नाहीतर परदेशात जाऊन भाजप तिथलेही पक्ष फोडतील....
मुंबई, २१ डिसेंबर २०२३ : भाजपला पक्ष फोडण्याची नशा आहे. तर चिलीम मारून भाजप पक्ष फोडण्यासाठी निघतो, असं वक्तव्य करत ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केलाय. इतकंच नाहीतर परदेशात जाऊन भाजप तिथलेही पक्ष फोडतील अशी जहरी टीका संजय राऊत यांनी करत भाजपला खोचक टोलाही लगावला आहे. संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या जहरी टीकेवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी पटलवार केलाय. तुम्ही ड्रग्ज घेऊन भ्रष्टाचार करतात असे म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलंय. ते असेही म्हणाले, गंजडी सारख्या नशेत तुम्ही वावरताय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची तुम्ही वाट लावताय. याची कधीतरी स्वतःला लाज वाटू द्या. कुणाचीही दलाली करा, पण पक्षाला फोडण्याचं काम तुम्ही केलंय. ज्यांची दलाली तुम्ही करताय. ते तुम्हाला लाथ मारल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत शिरसाट यांनी संजय राऊत यांना फटकारलं आहे.