जयंत पाटील यांच्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव? 'सामना'तून संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट

जयंत पाटील यांच्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव? ‘सामना’तून संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट

| Updated on: May 24, 2023 | 9:03 AM

VIDEO | ...म्हणून जयंत पाटील यांची ईडी चौकशी; ‘सामना’ अग्रलेखातून संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची काल तब्बल साडे नऊ तास ईडीने चौकशी केली. जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस आल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या याच ईडी चौकशीवरून दैनिक सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. जयंत पाटील यांनी भाजपची गुलामगिरी नाकारली. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळेच त्यांना ईडीचं बोलावणं आल्याचा मोठा गौप्यस्फोट ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. यासह जयंत पाटील यांनी भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले. त्यामुळे त्यांना लगेच ईडीचं बोलावणं आलं. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावं असा त्यांच्या वर दबाव होता. तशी राजकीय वर्तुळात चर्चाही होती. पण जयंत पाटील यांनी हा प्रस्ताव नाकारल्याने त्यांना ईडीचे बोलावणे आले. ईडीने अनेकांच्या बाबत असेच केले, असा दावाही या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

Published on: May 24, 2023 09:03 AM