Sanjay Raut स्पष्टच म्हणाले, ‘त्याशिवाय जरांगे पाटील उपोषण सोडतील असं वाटत नाही’
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून अद्याप काही निष्पन्न नाही, अशातच संजय राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात केलं मोठं भाष्य, काय म्हणाले बघा?
मुंबई, १२ सप्टेंबर २०२३ | गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी वैद्यकीय उपचारांना देखील नकार दिला होता आणि जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ‘केंद्राने जे विशेष अधिवेशन बोलवलं त्यात आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी आवश्यक ती सुधारणा करून सर्वसमावेशक तोडगा काढला पाहिजे.’ असे राऊत म्हणाले तर एक तरूण आपला जीव पणाला लावत असेल आणि सरकार केवळ चर्चा बैठका घेत असेल तर ते योग्य नाही. तुम्ही अंमलबजावणी काय करता हे महत्त्वाचे आहे. ठोस आदेशाचा कागद हातात पडल्याशिवाय मनोज जरांगे पाटील आपले उपोषण सोडतील असं वाटत नाही, असेही राऊत म्हणाले्.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..

सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'

कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
