निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांच्या हातात वाघनखं..., सामनातून नेमका काय साधला निशाणा?

निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांच्या हातात वाघनखं…, सामनातून नेमका काय साधला निशाणा?

| Updated on: Oct 08, 2023 | 12:55 PM

VIDEO | छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडन येथून भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर लवकरच ती वाघनखं भारतात येणार आहे. वाघनखं लंडमनधून आणणं म्हणजे निवडणूक स्टंट असल्याचे म्हणत सामनातून राज्य सरकारवर सडकून टीका, बघा सामनातून हल्लाबोल करण्यात आलाय.

मुंबई, ८ ऑक्टोबर २०२३ | वाघनखं लंडमनधून आणणं म्हणजे निवडणूक स्टंट असल्याचे म्हणत सामनातून राज्य सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. तर लंडनमधील वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा दावा इतिहासकारांनी फेटाळला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर 2014 साली महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद मोदींसोबत असल्याचे फलक मुंबईत लागले होते. यावेळी मोदींच्या हातात ‘वाघनखे’ दाखवून जाहिराती केल्या जातील, असे म्हणत संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार काही इंग्लंडवरून परत आली नाही. भवानी तलवारीचे राजकारणच अधिक झाले. आता महाराजांची वाघनखे आणावीत असे चालले आहे, पण अफझल खानाचा वध नक्की कोणत्या हत्याराने झाला? तलवार, खंजीर, बिचवा की वाघनखे ? इतिहास संशोधकांचे वाघनखांवर एकमत नाही, हे मात्र नक्की!’, असे सामनातील रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Published on: Oct 08, 2023 12:55 PM