Sanjay Raut यांचा केंद्रावर हल्लाबोल; म्हणाले, ‘इंडिया नाव बदलून लपवालपवी…’
VIDEO | 'इंडिया आघाडी स्थापन केल्यापासून इंडिया शब्दाच भय वाटू लागलय', उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजपसह केंद्रावर जोरदार टीकास्त्र आणि एक देश-एक निवडणूक यावरही केलं भाष्य
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर २०२३ | ‘देश लुटण्याचा आणि देशाला खड्ड्यात घालण्याचा प्रकार म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा प्रकार आहे. तर वन नेशन वन इलेक्शन हा फ्रॉड आहे.’, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार केंद्रावर जोरदार निशाणा साधला आहे. तर सध्या सुरू असलेल्या भारत आणि इंडियाच्या नावाच्या वादावरूनही संजय राऊत यांनी भाष्य केले. संजय राऊत म्हणाले, ‘इंडिया आघाडी आम्ही स्थापन केल्यापासून इंडिया शब्दाच भय वाटू लागलं आहे. देशातील सरकारला घटनेतील नावाचं भय वाटत आहे आणि हे विचित्र आहे. घटनेत भारत सुद्धा नाव आहे. पण इंडिया नावाला विरोध करणं हा डरपोकपणा, विकृतपणा आहे. यांनी नवा भारत निर्माण करण्याची गोष्ट केली होती. इंडिया नाव राहील, इंडिया आहे आणि भविष्यात इंडिया सत्तेवर येईल’, असे म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केला.
Published on: Sep 06, 2023 11:46 AM
Latest Videos