Sanjay Raut : ‘शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात’, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'अख्ख्या महाराष्ट्रात अराजक माजलं आहे. बजबजपुरी माजली आहे. हे मोदींच्या नावाने भजन करत आहे. रोज नव्या घोषणा करत आहेत. १०० दिवसांचा वेध घेणार म्हणतात. काय घेणार.', असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारलाच धारेवर धरलंय.
‘आमदार अमित गोरखे यांचे भिसे म्हणून पीए आहेत. या भिसेंची ती पत्नी आहे. विचार करा. भाजपच्या कार्यकर्त्याची पत्नी. तिच्यासाठी फडणवीस यांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेला असं सांगितलं जातं. तरीही त्या महिलेवर ही वेळ आली. एका मातेचा करूण अंत झाला. काय करतात फडणवीस’, असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला. पुढे ते असेही म्हणाले, सरकारला १०० दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसले आहेत. गोरगरीबांची कामे ही फडणवीस यांच्या लेव्हलची नाही. त्यांची लेव्हल खूप मोठी आहे. गोरगरीब मध्यमवर्गीय यांची कामे तडफडून मरतात, शेतकरी तडफडून मरतात, योजना कागदावर आहेत. पोपटपंची करत एकनाथ शिंदे आणि अजित पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात, असं म्हणत राऊतांनी सरकारवर जिव्हारी लागणारी टीका केली.
इतकंच नाहीतर ‘फडणवीस यांची झेप मोठी आहे. अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला, ठेकेदार मोठमोठे. त्यांची कामे होत आहे. त्यांची लेव्हल ती आहे. त्यामुळे फडणवीस यांना त्यांच्या लेव्हलची कामे सांगितली पाहिजे. ते छोटेमोठे काम करणार नाही. त्यांच्या पक्षाला ही सवयच नाही. त्यांची लेव्हल खूप वर गेली आहे. असे भाजपचे कार्यकर्ते तडफडून मरत आहे, बायका मुले… आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले आहे. मंत्रालयात बसून दम देणं सोपं असतं’, असं राऊत म्हणाले.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय

साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा

मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
