Sanjay Raut यांचा G-20 परिषदेवरून घणाघात; म्हणाले, ‘…तर ती जननी ही वांझ’
VIDEO | राजधानी दिल्ली येथे होत असलेल्या G-20 शिखर परिषदेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सडकून टीका, 'लोकशाहीच्या जननीमध्ये संसदेतील विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याला स्थान नसेल तर...'
मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ | दिल्लीमध्ये G20 परिषद मोठ्या उत्साहात होत आहे. जगातील मोठे नेते यामध्ये सहभागी झाले आहे. मात्र यावर लोकशाहीचा संदर्भ देत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. या देशात लोकशाही टिकली पाहिजे. G20 मध्ये लोकशाहीची फार मोठी तुतारी वाजवण्यात येतेय. पण जे काही कार्यक्रम झाले, जेवणावळीचे कार्यक्रम झाले. त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांना आमंत्रणच नाही. आलेल्या पाहुण्यांना जी पुस्तिका दिली त्यामध्ये भारत कसा लोकशाहीचा जनक आहे. जननी आहे, असं सांगितलं गेलं. पण त्या लोकशाहीच्या जननीमध्ये संसदेतील विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याला स्थान नसेल तर ती जननी ही वांझ तुम्ही करत आहेत, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला. राजाचं मन मोठं हवं, राज्यकर्त्याचं मन मोठं असावं लागतं. तुम्ही तुमच्या विरोधी पक्ष नेत्याचा द्वेष करत आहात. हे चुकीचं आहे, असंही त्यांनी म्हटलं.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
