Sanjay Raut यांचं खोचक वक्तव्य, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवर काय म्हणाले?
VIDEO | नव्या संसद भवनात झालेल्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या कालच्या भेटीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य, बघा नेमकं काय केलं खोचक वक्तव्य
नवी दिल्ली, २० सप्टेंबर २०२३ | अजित पवार यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी खोचक वक्तव्य करत असे म्हटले की, ‘मला माहित नाही त्यांच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम त्यांनी पाहावा. पक्षात फूट वैगरे पडत नाही. प्रफुल्ल पटेल हे कोणत्या पक्षात आहे मला माहित नाही, पण शरद पवार मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. शरद पवार यांनी निवडणूक आयोगासह न्यायालयात फुटीर गटाविरोधात खटला दाखल केला आहे.’ दरम्यान, नव्या संसदभवनात काल शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात भेट झाल्याचे पाहायला मिळाले. नव्या संसद भवनातील या भेटीवर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.
Published on: Sep 20, 2023 03:27 PM
Latest Videos