'या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस, तो म्हणजे... अन् बाकी सगळे...', संजय राऊत यांचा खोचक टोला

‘या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस, तो म्हणजे… अन् बाकी सगळे…’, संजय राऊत यांचा खोचक टोला

| Updated on: May 16, 2023 | 10:57 AM

VIDEO | दिल्लीच्या दारातील महाराष्ट्र पायपुसणं, संजय राऊत यांनी नेमका काय केला हल्लाबोल?

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल दिल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि ठाकरे गट यांच्याकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. दरम्यान, अशातच मात्र पोपट मेल्याची चर्चा जोरदार सरूये. विरोधकांनी शिंदे सरकारचा पोपट मेल्याची टीका केली जात असताना देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला होता. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलं. पोपट मेलाच आहे. फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचंय. मला वाटलं होतं की या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. बाकी सगळे अतीशहाणे किंवा मूर्ख आहेत. देवेंद्र फडणवीसच असं म्हणत असतील, तर शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील, असे म्हणत राऊतांनी खोचक टोला लगावला आहे. फडणवीसांना वकिलीचं ज्ञान आहे, त्यांना कायदा, प्रशासन कळतं. त्यांना राजकारण माहितीये. पडद्यामागे काय चाललंय हे माहिती आहे. तरी देखील ते अशी वक्तव्य करतायत म्हणजे त्यांची काहीतरी मजबुरी आहे, असेही ते म्हणाले.

Published on: May 16, 2023 10:57 AM