Sanjay Raut : ‘हा दलाल… माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी…’, राऊतांचा रोख कुणावर?
'तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते. अशा घाण दळभद्र्याच्या तोंडाला लागणं हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. कशाला प्रफुल्ल पटेल भेटल्यावर नमस्कार करतो.', असं राऊत म्हणाले आणि पटेलांवर हल्लाबोल केलाय.
‘ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘प्रफुल्ल पटेल दाऊदच्या पक्षातून जाऊन आले. दाऊदच्या पक्षातून भाजपमध्ये आले. भाजपमध्ये का आले तर आपली संपत्ती वाचवायला. पटेल संसदेत आहे आम्हाला लाज वाटते हो. दाऊदचे हस्तक भाजपने संसदेत घेतले. ते दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात, रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात. अजित पवार यांनी स्वत:चं अवमूल्यन करून घेतलंय.’, अशी टीका राऊतांनी केली. पुढे ते असेही म्हणाले, प्रफुल पटेल हे दलाल आहेत. पटेलांसारखे लोकं कुणाचेच नाहीत हे दलाल आहेत. कधी काँग्रेसची दलाली करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांना बाप बाप करत होते. कधी दाऊदची दलाली करत होते,अशा लोकांची संसदेत उभं राहून बोलण्याची लायकी आहे का? असा सवालच राऊतांनी केला. तर आम्ही कसले रंग बदलले. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहोत. तुम्हाला दाऊद इब्राहीमचा हिरवा रंग लागला आहे. मी प्रफुल्ल पटेलांना सांगतो माझ्या नादाला लागू नको. नागडा करीन, असं म्हणत टोकाचा इशारा राऊतांनी पटेलांना दिलाय.

रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल

पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?

इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण

सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
