उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, ‘कलंक’
त्यांनी भाजपवरून आरएसएसवर टीका करताना त्यांचे हिंदुत्व मान्य आहे का असा सवाल केला. याचबरोबर त्यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाना साधत टीका केली.
नागपूर : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी येथे पदाधिकारी सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप, शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. तसेच त्यांनी भाजपवरून आरएसएसवर टीका करताना त्यांचे हिंदुत्व मान्य आहे का असा सवाल केला. याचबरोबर त्यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाना साधत टीका केली. ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर, फडणवीस यांची हालत ही सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे. तर ते नागपूरला लागलेला कलंक आहेत, अशी टीका केली आहे. तसेच आपल्या शेतकऱ्याला पैसा लागला तर तो दागिने गहाण ठेवतो, मात्र येथे गावठी कट्टा गहाण ठेवला जातोय असे म्हणताना त्यांनी फडणवीस त्यांचा एक व्हीडिओ ऐकवला आणि त्यावरूनही हल्लाबोल केला. कधीकाळी फडणवीस हे मी पुन्हा येईन असे म्हणाले होते. ते आले. पण त्यांनी राष्ट्रवादीशी युती करणार नाही हे ही म्हटलं होतं. त्यानंतरही राष्ट्रवादीचा पक्षच पळवून त्यांच्याशी विविह केला असा घणाघात केला आहे. त्यामुळे भाजपचे नाव भ्रष्ट जनता पार्टी असले पाहीजे असाही टोला लगावला. त्यानंतर आता नागपूरसह महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.