Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि वाढवण बंदरविरोधी कृती समितीच्या सदस्यांमध्ये ‘फोन पे चर्चा’!
वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या कृती समितीचं नेमकं म्हणणं काय आहे, हे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ऐकून घेतलं. 5 फेब्रुवारी रोजी केंद्री मंत्रिमंडळाच्या (Centre government) बैठकीमध्ये वाढव बंदर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी 51 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीलाही केंद्रानं मान्यता दिली होती.
पालघर : वाढवण बंदराला (Vadhwan Port Project) विरोध करणाऱ्या सदस्यांसोबत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संवाद साधला. फोनवरुन त्यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत बातचीत केली आणि त्यांचा विरोध नेमका का आणि कशासाठी आहे, हे जाणून घेतलं. वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या कृती समितीचं नेमकं म्हणणं काय आहे, हे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ऐकून घेतलं. 5 फेब्रुवारी रोजी केंद्री मंत्रिमंडळाच्या (Centre government) बैठकीमध्ये वाढव बंदर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी 51 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीलाही केंद्रानं मान्यता दिली होती. मात्र या प्रकल्पाविरोधात मच्छिमार, शेतकरी आणि नागरिकांनी विरोध केला होता. या बंदराच्या विरोधात एक कृती समिती पालघरच्या वाढवण येथील लोकांनी तयार केली आहे. बंदराविरोधात या समितीच्या माध्यमातून लढा दिला जातोय.