उद्धव ठाकरे म्हणाले, ‘गोमुत्रधारी चंद्रकांत पाटील’, पण का?
VIDEO | बाळासाहेब ठाकरे यांचं महत्त्व कमी करण्याची भाजपची चाल, उद्धव ठाकरे यांनी 'त्या' विषयावरून केला जोरदार हल्लाबोल
मुंबई : बाबरी पडायला शिवसैनिक नव्हते असा खळबळजनक दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी जहरी टीका करत बाबरीच्या बाबत काय घडलं होतं त्याचा जुना इतिहास सांगितला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. असे बाबरीच्या खंदकातून उंदीर बाहेर पडायला लागले आहे. पण त्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी सगळे उंदीरच बिळात लपलेले होते. उंदीरच म्हणत भाजपवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. कोणताही उंदीर बिळातून बाहेर आलेला नव्हता. त्यावेळी आत्ताचे पंतप्रधान बांग्लादेशच्या लढ्यात किंवा हिमालयात असतील पण त्यांचे नाव मला कुठं आढळून आलेले नव्हते असं म्हणत तेथ नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे.